जळगावात एकाला दहा हजारात गंडवले

cyber

जळगाव प्रतिनिधी । निवृत्त कर्मचाऱ्यास सायबर ठकाने ऑनलाइन दहा हजारा गंडा घातला. बँकेतून बोलत असल्याची थाप मारीत एटीएम कार्डची माहिती जाणून घेत हा प्रकार दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप पोलीसांत नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत माहिती अशी की, प्रकाश त्र्यंबकराव पाटील (वय-60) रा. सानेगुरूजी कॉलनी जळगाव. हे फेडरेशनचे सेवानिवृत्त कर्मचारी असून आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास झोपेत असतांना अचानक त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. एसबीआय बँकेच्या मेन ब्रँचमधून बोलत असल्याची थाप मारली. तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे, असे सांगत कार्डची माहिती विचारून घेतली. पाटील यांना हा प्रकार खरा वाटल्याने त्यांनी समोरील व्यक्तीला कार्डचा क्रमांक सांगितला. 9 हजार 990 हजारांची रक्कम कपात झाल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवार पाटील यांनी सायबर पोलीसांकडे धाव घेतली व तत्काळ एमटीएम कार्ड ब्लॉक केले.

Protected Content