महेलखेडी येथे देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरले

 

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी येथील श्री सप्तश्रुंगी माता मंदीरातील सुमारे  ७o हजार रुपयांचे  दागीने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून , घटनास्थळाचे पंचनामा करण्यासाठी पोलीस दाखल झाले   आहेत.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, महेलखेडी तालुका यावल येथील मंदीरात शनिवार दि. १७ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील चौकातील अंधारचा फायदा घेत अज्ञात  चोरट्यांनी मंदीरातील देवीच्या अंगावरील २० ग्रामच्या सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याची पोतीचे दागिने मंदीराचे लोखंडीदार तोडुन चोरून  नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, गावातील भाविक बाळु राजु झुरकले हे सकाळी मंदीरात पुजाअर्चनासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या निर्देशनाश आला. यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजपुर मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सिंकदर तडवी यांनी भेट घेवुन मंदीराचे विश्वत अध्यक्ष आंनदा शिवराम येवले , उपाध्यक्ष नामदेव आसाराम झुरकले व रितेश अर्जुन महाजन , प्रमोद हरी महाजन , शेतेश महाजन व ग्रामपंचायत सदस्य यांची भेट घेतली. याबाबत  पोलीसात विश्वतांच्या फिर्याद वरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असून, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पोलीस अमलदार सिंकदर तडवी हे करीत आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.