एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील बालाजी ग्रुप एरंडोल संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवशी शाळेचा ५ व्या ‘ ॲन्युएल डे सेलिब्रेशन ‘ चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिरीष बर्वे , ओम त्रिवेदी , मोटीव्हेशनल स्पीकर तुषार चोटानी, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन प्रसादजी काबरे , मा.पियुषा काबरे मॅडम व परिवार यांचे हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या माता पालकांनी गणेश वंदना हा नृत्याविष्कार सादर केला. मान्यवर अतिथी व प्रेक्षकांनी माता पालकांचे कौतुक करून भरभरून प्रतिसाद दिला.
शाळेच्या प्राचार्या मा.फातेमा बोहरी मॅडम यांच्यासोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालनात सहभाग घेतला.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सुप्रसिद्ध मोटीव्हेशनल स्पीकर तुषार चोटानी यांचे बहुमोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.बहुसंख्य पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. अतिशय सुंदर उदाहरणासह तुषार सरांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तसेच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांची भुमिका स्पष्ट केली.यानंतर मनोरंजनासाठी काही नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.
याप्रसंगी सन २०२३-२४ या वर्षात विविध स्पर्धा, परीक्षा व खेळात प्राविण्य मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक , ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी बेस्ट टीचर अवाॅर्ड तसेच उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना म्हणून बेस्ट एम्प्लॉयी अवाॅर्ड ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट विद्यार्थी म्हणजेच ‘ स्टुडंट ऑफ द इअर ‘ म्हणून युक्ता काबरा या विद्यार्थीनीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी कार्यक्रमास अतिथी म्हणून सचिन देशमुख ( मॅनेजर,बॅंक ऑफ बडोदा),कीड झी चे रिलेशनशिप मॅनेजर संतोष मोरे आणि महेश टोपे यांना आमंत्रित केले होते. संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नवरस ( रास अनुभूती) या संकल्पनेवर सादर करण्यात आले होते.यात वीर रस, भक्ती रस,विभत्स्य रस,अदभूत रस, भयानक रस,करूणा रस, हास्य रस,रूद्र रस, शृंगार रस या नव रसांवर आधारित नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.मान्यवर अतिथींनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून भरभरून प्रतिसाद दिला.