मिनीट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोन जण जखमी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव रोडवरील हिरा मारुती मंदिरासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या मिनी ट्रकने पुढे जात असलेल्या दोन दुचाकींना मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग सुरेश राणे वय-३७ रा. भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वरणगाव पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, पराग सुरेश राणे हा तरुण त्याचे मित्र रोहित रतन जयराज आणि निलेश चौधरी असे तिघेजण सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दोन दुचाकीवरून वरणगावकडून भुसावळकडे जात होते. रस्त्यावरील हिरा मारुती मंदिरासमोर दोन्ही दुचाकीच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मिनीट्रक क्रमांक (एमएच १९ सीएक्स ९२) ने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार पराग सुरेश राणे याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवर असलेले रोहित जयराज आणि निलेश चौधरी हे जखमी झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मिनी ट्रक चालक हा वाहन घेऊन पसार झाला. जखमींना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार घेतल्यानंतर अखेर रोहित जयराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता मिनीट्रक वरील अज्ञात चालकाविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Protected Content