वृद्धपकाळ योजनेच्या बोगस लाभार्थींवर गुन्हे दाखल होणार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील संगोयोच्या ‘वृद्धपकाळ योजने’च्या लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थींवर आता  गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष शेखर पाटील यांनी दिली आहे.

तालुक्यात राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाअंतर्गत जेष्ठ नागरीकांसाठी मिळणाऱ्या वृद्धपकाळ योजने अंतर्गत बोगस प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक व दिशाभुल करून गरजूंच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येवून त्या सर्व बोगस लाभार्थ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.

यावल तालुका संजय गांधी निराधार समितीची सर्वसाधारण मासिक सभा आज तहसीलच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, संजय गांधी निराधार योजना विभागाच्या नायब तहसीलदार बबीता भुसावरे, समितीचे सदस्य तुषार सांडूसिंग पाटील, राजु अरमान तडवी, सुभाष साळुंके, नितिन महाजन यांची उपस्थिती होती.

या सभेत शासनाच्या सामाजीक न्याय विभागाव्दारे विविध योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आलेल्या एकूण ३५० पैक्की १०० प्रस्तावानाच मंजूरी देण्यात आली तर २५o प्रस्ताव हे नामंजूर करण्यात आली. सभेच्या अंती आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर पाटील यांनी सांगीतले की “यावल तालुक्यातील अनेक श्रीमंत मंडळींनी आपले वयोवृद्ध योजने अंतर्गत बोगस प्रकरण मंजुर करून घेत शासनाची फसवणूक करून, गरजु वृद्धांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे.

या सर्व प्रकरणात बोगस लाभार्थ्यांनी शासनाचे हजारो रुपये लुटले असून अशा बोगस लाभार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने नोटीस पाठविण्यात येणार असून वृद्धपकाळ योजनेचे बोगस प्रस्ताव सादर करून त्यांनी लाटलेले शासनाचे अनुदान हे दंडासह वसुल करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहीती शेखर पाटील यांनी दिली. असुन , या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील अनेक बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content