पाचोऱ्याच्या लोक न्यायालयात ५९९ दाव्यांचा निपटारा

 

पाचोरा, प्रतिनिधी  । येथे आज आयोजित लोक न्यायालयात ५९९ दाव्यांचा निपटारा करण्यात आला

 

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण  तथा उच्च न्यायालय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समितीमार्फत राष्ट्रीय लोक न्यायालय आज आयोजित करण्यात आले होते . या  लोक न्यायालयात ५९९ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होऊन १ कोटी २१ लाख ५० हजार ३८१ रुपयांची वसुली झाली.

 

सर्वाधिक स्टेट बँकेच्या  दाव्यांचा निपटारा झाला.  या लोकन्यायालयात पाचोरा तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, पाचोरा तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरवाडे, वकील मंचचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, सचिव अॅड. कैलास सोनवणे, पंच सदस्य व जेष्ठ वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी पाचोरा तालुका विधी सेवा समितीचे प्रभारी अध्यक्ष एल. व्ही. श्रीखंडे यांनी आवाहन केले की, यापुढे होणाऱ्या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा लोकन्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ पाचोराचे अध्यक्ष व सभासद वकील मंडळी, पंचायत समितीचे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, बँक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी , तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक बी. एम. भोसले, कनिष्ठ सहाय्यक डी. के. तायडे व न्यायालयातील सर्व कर्मचारी आणि पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.

 

Protected Content