रावेर शहरावर आता १२० सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची करडी नजर !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिशय संवेदनशील मानल्या जाणार्‍या रावेर शहरावर आता १२० सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार असून आज मान्यवरांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.

संवेदनशील रावेर शहरावर १२० सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर असणार आहे. आज रावेर पोलिस स्थानकात जातीय सलोखा व शांतता समिती बैठक तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे लोकार्पर तर विश्रामगृह उदघाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, आयएएस अर्पित चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, प्रांतधिकारी कैलास कडलक, तहसीलदार बंडू कापसे, तहसीलदार मयूर कळसे, मुख्यधिकारी स्वालिया मालगावे, कॉंग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी यांची प्रमुख उपस्थीती होती.

रावेर शहरात १७ लाख २५ हजार खर्च करून १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या माध्यमातून संपूर्ण शहर सीसीटीवीच्या नजरेत असणार आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, दारा मेंबर,बाजार समिती उपसभापती योगेश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर,कॉग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील,राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख,भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील,कॉग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील सोपान पाटील,माजी नगर सेवक अशोक वाणी, भाजपा माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, मुस्लिम पंच कमेटी यूसुफ खान,मोहर्रम पंच कमेटी अब्दुल रफीक अब्दुक अजीज,गयास शेख,गयासुद्दीन काझी उपस्थित होते.सूत्रसंचलन पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी केले.

Protected Content