कंगना राणावत विरोधात फौजदारी गुन्हा दाखल

 

तुमकूर, कर्नाटक, वृत्तसंस्था । कर्नाटकच्या तुमकूरमध्ये कंगना राणावत हिच्याविरुद्ध शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा आरोप करत फौजदारी खटला दाखल करण्यात आलाय. कंगना राणावत हिनं आपल्या ट्विटमध्ये कृषी विधेयकांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं या तक्रारीत म्हटलं गेलंय.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकतेच तीन कृषि विषयक विधेयके सादर करण्यात आली. विरोधकांचा विरोध डावलून ही विधेयके मंजूर करून घेण्यात आल्यानंतर विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनं करत आपला या विधेयकांना विरोध जाहीर केला.

कृषी विधेयक आणि शेतकरी संघटना या विषयातही अभिनेत्री कंगना राणावत हिनं हस्तक्षेप करत मोदी सरकारची बाजू उचलून धरली. ‘पंतप्रधानजी कुणी झोपलेलं असेल तर त्याला जागं करता येतं. गैरसमज असतील तर त्याला समजावलं जाऊ शकतं पण झोपलेल्याचं नाटक करणाऱ्यांना, समजलंच नसल्याचं नाटक करणाऱ्यांना तुमच्या समजवण्यानं फरक पडणार नाही. हे तेच दहशतवादी आहेत, सीएए मुळे एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही पण त्यांनी रक्ताचे पाट वाहिले’ असं ट्विट कंगना राणावत हिनं केलं होतं.

Protected Content