जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर हुडको येथील चिन्या उर्फ रविंद्र रमेश जगताप याचा न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल १४ महिन्यांनी मंगळवारी तत्कालीन कारागृह अधीक्षकासह चार जणांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी ,कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अश्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसात वर्ग करण्याचे काम सुरु होते. संशयितांना लवकरात लवकर अटक करावी, आरोपी चाणाक्ष आहेत, ते आता पळून जाऊ शकतात त्यामुळे आता वेळ वाया न घालवता पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप यांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील , दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे .
कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मयत चिन्याची पत्नी मीना जगताप यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या पाच जणांविरोधात नशीराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.