दुचाकीच्या धडकेत वृध्द महिला जखमी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील तळवेल फाटा ते बसस्थानक दरम्यान पायी जात असलेल्या वृद्ध महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीधारकावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मी सुपडू शिंदे वय-७२ रा.तळवेल ता. भुसावळ या वृद्धा महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील तळवेल फाटा ते बसस्थानक दरम्यान त्या पायी येत होत्या. मंगळवार ५ मार्च रोजी सांयंकाळी ६ वाजता त्यांच्या मागून येणारी दुचाकी (एमएच १९ डी ६७८८) वरील चालक सुमित पिंटू कोळी रा. तळवेल ता. भुसावळ याने जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला लक्ष्मीबाई शिंदे या गंभीरित्या जखमी झाल्या. दरम्यान याप्रकरणी गुरुवार ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीधारक सुमित पिंटू कोळी यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कंकर हे करीत आहे.

Protected Content