जळगाव प्रतिनिधी । जळगाव क्रिकेट लीगमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाने आपला प्रोमो जारी केला असून स्पर्धेत तगडे आव्हान उभे करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
जळगाव क्रिकेट लीगमध्ये प्रकाश चौबे यांच्या मालकीचा कोझी कॉटेज स्ट्रायकर्स हा संघदेखील सहभागी झाला आहे. या चमूचे प्रशिक्षक संतोष बडगुजर तर आयकॉन खेळाडू शशांक अत्तरदे हा आहे. तसेच संघातील अन्य खेळाडूदेखील प्रतिभावंत आहेत. जेसीएलमध्ये जोरदार कामगिरी करण्यासाठी हा संघ सध्या कसून सराव करत आहे. या संघाला प्रकाश चौबे आणि सागर चौबे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. दरम्यान, या संघाने आपला एक प्रोमो जारी केला असून यात तगडे आव्हान उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघ : मालक- प्रकाश चौबे, कोच- संतोष बडगुजर, आयकॉन खेळाडू- शशांक अत्तरदे. इतर खेळाडू – संकेत पांडे, सचिन पटेल, मंजित सोनार, स्वप्निल जाधव, गणेश रतिलाल लोहार, जितेंद्र नाईक, जावेद शेख, संदेश सुरवाडे, दिलीप विश्वकर्मा, नरेंद्र बावस्कर, सागर चौधरी, नयन दिलीप देशमुख, देवरे अविनाश, आमिर खान सलीम, शुभम पाटील, पवन तायडे, ओम तुकाराम मुंडे.
पहा :- कोझी कॉटेज संघाच्या जोरदार प्रोमोचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/353879881881420/