यावल प्रतिनिधी । बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील जामुनझिरा येथे घडली आहे. यात सहा वर्षाच्या बालिकेवर तिच्या चुलत भावाने अत्याचार करून तो फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
यावल तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर २२ वर्षाच्या तरूणाने शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या सख्ख्या काकाच्या ६ वर्षीय मुलीस पाड्यालगत असलेल्या केळीच्या शेतात आमिष दाखवून नेले. यानंतर या नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेतील बालिका घरी आल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.