जिल्ह्याची कोरोनामुक्तीची आशा बळावली ; आजचे रुग्ण १९४

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १९४ बाधित रूग्ण आढळले आहे. तर २१९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दिवसभरात आज ६ बाधितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२२, जळगाव ग्रामीण-१३, भुसावळ-१५, अमळनेर-०, चोपडा-११, पाचोरा-५, भडगाव-१, धरणगाव-५, यावल-२१, एरंडोल-७, जामनेर-१३, रावेर-२० पारोळा-२, चाळीसगाव-३४, मुक्ताईनगर-५, बोदवड-१३ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १९४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ३३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार २७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ६ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

Protected Content