Home क्राईम लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे एकजण जखमी

लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे एकजण जखमी

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एकाला शिवीगाळ करून लोखंडी पट्टीने मारहाण करून खिश्यातील पैसे काढून नेल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक रामभाऊ गावडे वय ५१ रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नास्ता गाडी लावून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १७ जानेवारी रोजी रात्र ८ वाजता छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असतांना गोलू उर्फ कन्हैय्या चव्हाण रा. धनाजी काळे नगर, जळगाव याने कारण नसतांना शिवीगाळ करून लोखंडी पट्टीने मारहाण करून दुखापत केली व खिश्यातील पैसे काढून पसार झाला. याप्रकरणी रात्री ११ वाजता संशयित आरोपी गोलू चव्हाण याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound