जळगावात तरूणावर चॉपर हल्ला; एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ एकमेकांना शिवीगाळ करण्याच्या कारणावरून एका तरूणावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवार, १६ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी १७ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, हेमराज येसाजी चव्हाण (वय- ३६, रा.बालाजीपेठ, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हेमराज हा त्याचा मित्र रोहन कुरकुरे हे दोघेजण पायी जात असतांना भगवान सोनवणे वय-४१ रा.शिवाजी नगर याचा फोन आला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

शिवीगाळ का करतोय असे विचारल्यावर त्याने गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील डीपीजवळ असल्याचे सांगितले. तेथे गेल्यावर भगवान सोनवणे व इतर दोघांनी धक्काबुक्की करत एकाने चॉपर काढून पोटात वार केला. जखमी अवस्थेत असलेल्या हेमराज चव्हाण याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बुधवारी १७ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भगवान सोनवणे याला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Protected Content