व्हॉटस्ॲपवर अवैध शस्त्राची विक्री-खरेदी करणारे आरोपी  जेरबंद

Gawathi katta

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सोशल मीडियावर अवैध शस्त्राची खरेदी आणि विक्री करणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या घटनेत अवैध गावठी पिस्तूलासह अटक केली. दोघांविरोधात अमळनेर आणि मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अमळगाव जळोद रोडवरील अमळगावाजवळ 23 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी गुरूचरणसिंग आवसिंग बर्नाला (वय-21) रा. उमर्टी ता.वरला जि.बडवानी, मध्यप्रदेश याच्याजवळ दोन अवैधरित्या दोन गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले  यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सदर अवैध शस्त्राचे रॅकेट शोध कामी विभागीय पोलीस अधिकारी राजेद्र ससाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम, अमळनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पथक तयार केले. त्याला सापळा रचून अटक करत त्याच्या ताब्यातील चाळीस हजार रूपये किंमतीचे दोन गावठी पिस्तूल हस्तगत केले. त्याच्या विरोधात  मारवड पोलीस  स्टेशनला भाग -५ गुरन.२४/२०१९ आर्म ऍक्ट ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेती आज 8 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील असोदा मटन हॉटेल जवळील डिपीच्या शेजारी संशयित आरोपी सागर निंबा शेटे (वय-26) रा. शिरूड नाका, दत्त मंदीराजवळ याच्या ताब्यात अवैधरित्या २५ हजार रूपये किंमतीच गावठी कट्टा हस्तगत करून त्याला अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात अमळने पोलीसात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडुन सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मनोज दुसाने, दिपक शिंदे, प्रविण हिवराळे, दिनेश बडगुजर, किरण धनगर, महेश पाटील, दिपक छबु पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे  पोना शरद तुकाराम  पाटील व पोकॉ. रविंद्र  अभिमन पाटील व  मारवड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. विजय साळुखे, पोना.सुनिल आगोणे, यांनी कारवाई केली.

Protected Content