Home आरोग्य दिलासादायक : जिल्ह्यात आज ५८९ रूग्ण कोरोनामुक्त; १४० बाधित रूग्ण आढळले !

दिलासादायक : जिल्ह्यात आज ५८९ रूग्ण कोरोनामुक्त; १४० बाधित रूग्ण आढळले !


जळगाव प्रतिनिधी । कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या कमी झाल्याचे जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आज जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्हाभरातून आज १४० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले आहे. तर ५८९ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर -१३, जळगाव ग्रामीण- ११, भुसावळ-७, अमळनेर-६, चोपडा-१, पाचोरा-८, भडगाव-६, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-३०, जामनेर-२१, रावेर-२, पारोळा-५, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-२ आणि बोदवड-२ असे एकुण १४० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ४४६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३३ हजार ५८९ रूग्ण कोरोना मुक्त झालीत तर उर्वरित ४ हजार ३०४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ५ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे. 


Protected Content

Play sound