नवी दिल्ली– आयसीएमआर व भारत बायोटेक हे संयुक्तरीत्या विकसित असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक हे संयुक्तरीत्या विकसित असलेल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारकडे २ ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता.
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. अॅस्ट्राझेनिसा लसीच्या भारतातील चाचण्यांचा दुसरा व तिसरा टप्पा सिरमच्या सहकार्याने पार पडत आहे.