Home उद्योग कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ६१८ बाधित रूग्ण आढळले; ६७० रूण...

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ६१८ बाधित रूग्ण आढळले; ६७० रूण कोरोनामुक्त

0
104


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात कालप्रमाणे आज देखील दिलासादायक रूग्ण संख्या दिसून आली. दिवसभरात जिल्ह्यात ६१८  बाधित रूग्ण आढळले तर ६७०  रूग्ण कोरानामुक्त झाले आहेत. आज एकुण ११  कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला तर  पारोळा येथे एकही रुग्ण आढळून आला नाही.  

 

जिल्हाभरातील आजची आकडेवारी 

जळगाव शहर-६६, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-५७, अमळनेर-३९, चोपडा-८५, पाचोरा-६, भडगाव-४, धरणगाव-३५, यावल-३४, एरंडोल-४५, जामनेर-६०, रावेर-३२,  चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-३२, बोदवड-३५ आणि इतर जिल्ह्यातील ४  असे एकुण ६१८  बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३४  हजार ५११  बाधित रूग्ण आढळले आहे. त्यापैकी १ लाख २२  हजार ४५२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत तर ९ हजार ६५३  बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११  रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound