हिंगोणा येथे स्वर्गरथाचे संतांचे हस्ते लोकार्पण

फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथे स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी स्वामी नारायण गुरुकुल चे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्ति प्रकाश महाराज होते प्रमुख पाहुणे म्हणून म स सा का संचालक नरेंद्र नारखेडे व सदगुरू शास्त्री भक्ती किशोर महाराज, माजी सरपंच राजेंद्र महजन, डॉ. व्ही. जे. वारके, माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांची  व्यासपीठावर उपस्थित होती. स्वर्गरथ हा स्वर्गीय प्रभाकर गाजरे व स्वर्गीय मिलिंद प्रभाकर गाजरे यांचे समरणार्थ माधवी चिरमाडे यांनी संपूर्ण खर्च देऊन हिंगोणा ग्रामस्थांना लोकार्पण केला. या कार्यासाठी लीलाताई गाजरे व प्रसिध्द साहित्यिक प्रा. व. पु. होले सर यांनी प्रेरणा दिली. या सामाजिक कार्याबद्दल मान्य वर पाहुण्यांनी दात्यांनी अभिनंदन केले असून सामाजिक गरजा भागविण्यासाठी धनिकांनी पुढे येऊन गाव आत्मनिर्भर करावे असे आवाहन मनोगतात व्यक्त केले.

याप्रसंगी श्री जनार्दन महाराज नरेंद्र नारखेडे भक्तीप्रकाश यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम अगदी मोजक्या मान्यवरांचे उपस्थित कोरोना नियमाचे पालन करून पार पडला. स्वर्गरथ हिंगोणा ग्रामपंचायत यांचे ताब्यात दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व  छगन गाजरे  श्याम महाजन विष्णू महाजन भरत पाटील रवींद्र हरी पाटील मनोज वायकोळे उपस्थित होते. प्रास्ताविक  अशोक फालक यांनी केले. आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक  सदाशिव पाटील सर यांनी केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.