कोव्हॅक्सीनच्या दुसर्‍या डोससाठी लसी उपलब्ध

जळगाव प्रतिनिधी । अनेक जणांना कोव्हॅक्सीन लसचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा उपलब्ध होत नसल्याचे ते चिंताग्रस्त बनले आहेत. तथापि, जिल्ह्यासाठी या लसीचे २३०० डोस उपलब्ध झाले असून यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील कोव्हॅक्सिनचे डोस संपल्याने अनेक जण त्रस्त झाले आहेत. यात जिल्हा प्रशासनाला २३०० नवीन डोस प्राप्त झाले. त्याचे वितरण करण्यात आले असून जिल्ह्यात ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा मिळाला आहे. त्यांना दुसरा डोस उपलब्ध होणार आहे. शहरातील ५ केंद्रावर कोविशील्ड तर दोन केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असणार आहेत. हे डोस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्याने देण्यात येणार आहे. तर उपलब्धतेनुसार पहिला डोस मिळू शकणार आहे.

मनपाच्या शाहू हॉस्पिटल, डी. बी. जैन रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, मुलतानी हॉस्पिटल व शाहिर अमर शेख रुग्णालय या पाच केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध असून ती ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठी असणार आहे. तर, णपती नगरातील स्वाध्याय भवन व मायादेवीनगरातील रोटरी भवन या दोन केंद्रांवर रविवारी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार असून ती केवळ ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठीच मिळणार आहे. दरम्यान, रेडक्रॉस सोसायटीचे लसीकरण केंद्र रविवारी बंद असणार आहे.

तर, दुसरीकडे जिल्हा प्रशासनानेे खासगी पातळीवरून कोव्हॅक्सीनच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. यात पहिल्या टप्प्यात डॉ. पराग चौधरी (विजेंद्र हॉस्पिटल), डॉ. राजेश पाटील (विश्‍वप्रभा हॉस्पिटल), आनंद पलोड (महेश प्रगती मंडळ), डॉ. राजेंद्र भालोदे (कमल हॉस्पिटल), हरीश मुदंडा (विश्‍व हिंदू परिषद), डॉ. योगेंद्र नेहेते (नेहते हॉस्पिटल), चंद्रकांत नाईक (जैन इरिगेशन सिस्टीम), अमरेंद्रनाथ चौधरी (कांताई हॉस्पिटल), डॉ. पारस जैन (रोटरॅक्ट क्लब) यांना परवानगी देण्यात आलेली आहे.

जिल्ह्याचा विचार केला असता पुढील केंद्रांना परवानगी देण्यात आलेली आहे.-डाॅ. प्रवीण पाचपांडे,पाचपांडे हाॅस्पिटल, डाॅ. संभाजीराजे पाटील, श्रीसाई हाॅस्पिटल, पाचाेरा, डाॅ. आशिष वाघ, मिरा हाॅस्पिटल, जामनेर, डाॅ. प्रदीप फेगडे, मुक्ताई प्रसुतीगृह, भुसावळ, डाॅ. वैशाली नेरकर, आई हाॅस्पिटल, पाराेळा, डाॅ.सुरेश पाटील, श्रध्दा हाॅस्पिटल, पाराेळा, डाॅ.तुषार चाैधरी, दत्त हाॅस्पिटल, सावदा, विजय माेहन, सिंधी साई बहुउद्देशिय संस्था, भुसावळ, आेम ठाकुर, रिलायन्स जीआे, (अमळनेर, चाळीसगाव व जळगाव), डाॅ. भारत पाटील, पाटील हाॅस्पिटल, चाेपडा. डाॅ. संदीप पाटील, माऊली हाॅस्पिटल, रावेर, डाॅ. उमाकांत पाटील, श्रीयुला हाॅस्पिटल, जामनेर, डाॅ. विनाेद चाैधरी, आई हाॅस्पिटल, भुसावळ, डाॅ.दिनेशसिंग पाटील,द्वारकाधिश हाॅस्पिटल, भुसावळ, डाॅ.धनंजय पाटील, माेरया हाॅस्पिटल पाराेळा, डाॅ. नीलेश पाटील, कांताई हाॅस्पिटल, पाराेळा, नितीन अहिरराव, राेटरी क्लब चाेपडा, डाॅ. विजय पाटील, वृंदावन हाॅस्पिटल, पाचाेरा,

Protected Content