जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात रूग्ण संख्या कमी होत आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयात आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात १४ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. तर ३२ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १० तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्हाभरात एकुण १ लाख ४२ हजार ४२४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३१३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज एकाही बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही त्यातच १० तालुका निरंक असल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.