पी.जी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नाशिकला अभ्यास दौरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या पी. जी.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नाशिक येथील वाईन्स निर्मिती औद्योगिक समूहास भेट दिली. हा अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी वाईन निर्मितीबाबत शास्त्रीय माहिती घेतली.

विद्यार्थ्यांना नाशिक शहरात येणाऱ्या द्राक्ष फळापासून निर्माण होणाऱ्या २२ प्रकारच्या वाईन्स निर्मिती बद्दल माहिती देण्यात आली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार होणाऱ्या वाइन बनविण्याकरिता फळांवरील विविध सूक्ष्मजंतू काही विकरे (एंझाइमे) निर्माण करतात. प्रोटिएज आणि पेक्टिनेज या विकारांचे प्रमाण कमी झाले तर वाइन गढूळ किंवा धुरकट होते आणि जास्त झाले, तर वाइन नितळ होऊन तिची प्रत सुधारण्यास मदत होते. ग्लुकोसिडेज विकरामुळे वास व चव ठरते. एस्टरेजमुळे वास ठरतो असे सांगण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांसोबत प्रा.संदीप पाटील, प्रा. दीक्षा सातपुते उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्राचार्य व्ही.एस. झोपे यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content