मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडील शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याची मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे.
यासंदर्भातील परिपत्रक दिनांक 27 जून 2022 रोजी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून सदरिल पत्र जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची स्वाक्षरी निशी जारी करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती खालील प्रमाणे करण्यात आल्या नियुक्त्या :-
आ.चंद्रकांत पाटील (विधानसभा सदस्य) यांची अध्यक्षपदी तर सदस्यपदी डॉ. जगदिश पाटील (काँग्रेस नेते); छोटू भोई; अफसर खान; नवनीत पाटील; शेषराव कांडेलकर; मंगला (हिरा शेठ) राणे; रुपाली चोपडे; आशा कांडेलकर यांच्यासोबत तहसीलदार हे पदसिद्ध सदस्य सचिव असतील.