यावल तालुक्यात कोरोनामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्यु; वर्षभरात दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण

 

यावल : प्रतिनिधी ।  संपुर्ण जगासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले  यात तालुक्यात  कोरोनाबाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असून  वर्षभरात  सुमारे दोन हजार लोक बाधीत आहेत .

 

मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणि  राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु केली  होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण कोरपावली येथे सापडला होता यावल शहरातही जुनअखेर  शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ . सलीम शेख यांचा  मुलगा कोरोना बाधीत आढळुन आला होता ,  पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात  ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र असे  ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले  होते .

 

तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासन , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने   उल्लेखनिय कार्य केले  त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे  सहकार्य मिळाले . डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या  शासन आदेशाची अमलबजावणीसाठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे  सन्समर्नीय  आहे .

आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७० पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादायक व प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे  वारंवार प्रशासनाच्यावतीने सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे , सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .

Protected Content