‘त्या’ तलाठ्यांच्या नोकरीवर गंडांतर : चौकशी होणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्य सरकारने जंबो तलाठी भरती जाहीर केली असतांना याआधी २०१९ साली करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार चर्चेत आला असून यातून तेव्हा रूजू झालेल्या अनेकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

 

२०१९ साली करण्यात आलेली तलाठी भरती ही आधीपासूनच वादात सापडलेली आहे. यात आता स्पर्धा परिक्षा समन्वय समितीने यात मोठा गैरव्यवहार करण्यात आला असल्याने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सदर  तलाठी पदभरतीची परीक्षा महा-आयटी विभागाअंतर्गत येणार्‍या महापरीक्षा संकेतस्थळाकडून घेण्यात आली. ज्याचे काम यूएसटी ग्लोबल कंपनीला देण्यात आले होते. या भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण, या गैरप्रकारांचा तपास फक्त अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच केला होता. यातून अहमदनगर जिल्ह्यातील संशयास्पद १४ उमेदवारांवर गुन्हे दाखल करून त्यांना बाद करण्यात आले. परंतु, अहमदनगरच्या २३६ पैकी इतर उमेदवार तसेच इतर जिल्ह्यांमधील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. नेमके याचवरून ही भरती प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यामध्ये सापडली आहे.

 

े या घोटाळ्याचा तपास न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली, त्रयस्थ पोलीस अधिकार्‍यांची विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी नेमून करण्यात यावा. तसेच अहवाल डावलल्याचा आरोप असलेले महसूलचे तत्कालीन सचिव तसेच महा-आयटीचे तत्कालीन संचालक अशा बड्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. असे झाल्यास २०१९ सालीच्या तलाठी भरतीतील अनेक उमेदवारांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

Protected Content