बंडखोरांवर कारवाईच्या मुद्द्यावरून ना.महाजन अन ना.पाटील यांच्यात वादंग (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 10 13 at 12.37.55 PM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन ना.गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींची सभा असलेल्या स्थळी जोरदार वाद झाला. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची बाब आपण मोदींसमोर मांडू, असा पवित्रा गुलाबरावांनी घेतला असता महाजनांनी त्यांना तसे करता येणार नाही, असे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

 

जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपा कार्यकर्ते युती धर्माचे पालन करताना दिसत नाहीत, माझ्याविरुद्ध बंडखोरी करून उमेदवारी करीत असलेले उमेदवार प्रचारात भाजपचे झेंडे हातात घेवून आणि भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून प्रचार करीत आहेत. याची मी तक्रार केली आहे, असा आरोप या मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी आले असता पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी आपण बोलण्याची परवानगी मागितली असून काय होते, ते बघू असेही गुलाबराव म्हणाले. महायुती झाली असल्याने दोन्ही पक्षांनी त्याचे पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

 

Protected Content