चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ पिंप्री-सोनवद गटात ट्रॅक्टर रॅली (व्हीडीओ)

ceb19382 7a24 482c 9b91 7592ff5f15f2

धरणगाव (प्रतिनिधी) आज तालुक्यातील पिंपरी-सोनवद व नांदेड साळवा गट तसेच रोटवद या ठिकाणी आज अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यातील पिंप्री-सोनवद गटात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

 

चोपडा, अमळनेर, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर या इतर मतदार संघात भरीव स्वरूपाची कामे आपल्याला बघायला मिळतात. मात्र, जळगाव ग्रामीण मतदार संघ मागील अनेक वर्षात कोरडाच राहिल्याचा आरोप यावेळी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या समर्थकांनी केला. तसेच पाण्याचा प्रश्न गटारीमध्ये असलेली घाण, रस्त्याला पडलेले खड्डे, शेत रस्त्यांच्या प्रश्न, शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था अजूनही उपलब्ध नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर रॅलीत सहभाग घेतला.

 

Protected Content