पंतप्रधान मोदींना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हे देशासाठी- शरद पवार

पुणे – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना मिळालेला पुरस्कार हे देशासाठी असल्याचे सांगून कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली होती. यानुसार आज पुण्यात त्यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस असे अनेक होते. अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Protected Content