ओटीपी देणे भोवले; ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फोन-पे बँकेची ऑफर असून दिलेल्या लिंकच्या माध्यमातून एकाची बँक खात्यातून ५० हजार ५४८ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरण अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र दगा चौधरी रा. एलआयसी कॉलनी, सम्राटा हॉटेलच्या मागे, अमळनेर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविंद्र चौधरी हे २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरी असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन-पे ची ऑफर असल्याचे बतावणी करून रविंद्र चौधरी यांना एक लिंक पाठविली. लिंकच्या माध्यमातून माहिती भरत ओटीपी विचारला. ओटीपी दिल्यावर तुम्हाला ऑनलाईन कॅश मिळेल असे सांगितले. त्यानुसार रविंद्र चौधरी यांनी बँकेचा ओटीपी दिला असता त्यांच्या खात्यातून एकुण ५० हजार ५४८ रूपये ऑनलाईन डेबीट झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामकृष्ण कुमावत करीत आहे.

Protected Content