चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात ऑनलाईन चिंतनीय व्याख्यान

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात क्रांतीदिनानिमित्त चिंतनिय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदर्श शिक्षक भरत काळे यांनी मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन काळात ‘शाळा बंद उपक्रम सुरू’ या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या प्रेरणेने व तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते व उपशिक्षक पवन लाठी यांच्या संकल्पनेतून क्रांती दिनानिमित्त आपल्या प्राणाची पर्वा न करता भारत मातेच्या स्वतंत्रते साठी प्राण दिलेल्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन विद्यालयातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सोबत ऑनलाईन पद्धतीने केले.

जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वरवंडी तांडा नंबर २, तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील आदर्श शिक्षक भरत काळे यांचे व्याख्यान आयोजित करून ‘गुगल मिट’ या ॲपद्वारे शेकडो प्रेक्षकांना ६ लाख ३२ हजार शहीद क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या शौर्य कथा सांगितल्या व त्यातून आज आपण काय करायला हवे ? काय नाही. याबद्दल प्रेरणा व मार्गदर्शन करत चिंतन करण्यास भाग पाडले.

शाळा जरी बंद असल्या तरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरी बसून उपक्रमात सहभागी झालेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन लाठी, राकेश विसपुते यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅडव्होकेट रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, गोवर्धन पोतदार, डॉक्टर विनित हरताळकर, डॉक्टर निता हरताळकर, स्नेहीजन, विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी सहभागी होते.

Protected Content