अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला उद्यापासून होणार सुरुवात !

मुंबई (वृत्तसंस्था) अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-१ भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- २ विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज पसंतीक्रम भरायचा आहे.

 

सध्या प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता १२ ऑगस्टपासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. या भागामध्ये महाविद्यालयनिहाय पसंती क्रम भरावे लागणार आहेत. प्रवेशाची शुन्य फेरीही उद्यापासून सुरू होईल. यामध्ये विविध कोट्यातील प्रवेश व रिक्त जागा समर्पित करता येतील. अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक नुसार १२ ते २२ ऑगस्टपर्यंत अर्जाचा भाग २ भरणे. यामध्ये पहिल्या नियमित गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे, कोट्याअंतर्गत प्रवेश, कोट्यातील शिल्लक जागा ऑनलाईनसाठी उपलब्ध करणे. २३ ते २५ ऑगस्टपर्यंततात्पुरती- संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्याचा समावेश असणार. यादीवर हरकती, आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येणार. ३० ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. तसेच प्रवेश नाकारणे किंवा रद्द ही करता येणार आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळाले त्यांना त्या कॉलेजात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्यांना विशेष फेरीपर्यत थांबावे लागेल.

Protected Content