नांदुरा येथे कर्मचारी समन्वय समितीची बाईक रॅली

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनी पेन्शन मागणीसाठी  आज  नांदुरा तालुका व जिल्हास्तरावर बाईक रॅलीचे कर्मचारी समन्वय समितीतर्फे आयोजन करण्यात आले.

 

आज  नांदुरा तालुक्यामध्ये प्रशांत जामोदे यांचे नेतृत्वात कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून मोठ्या सहभागाने कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. सर्व कर्मचाऱ्यांना म्हातारपणामध्ये एक आधार मिळावा त्यासाठी जुन्या पेन्शनच्या मागणीचा जोर कर्मचाऱ्यांनी धरला आहे. यासाठीच आज नांदुरा तालुक्यामध्ये ५२० कर्मचारी बांधव व महिला कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

 

समन्वय समितीने बाईक रॅली काढून कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. या बाईक रॅलीमध्ये महिला ,पुरुष, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या बाईक रॅलीमध्ये जुन्या पेन्शन संदर्भात घोषवाक्य देऊन कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश हा महाराष्ट्र तसा भारत सरकार पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या बाईक रॅली ची सुरुवात  मोठा हनुमानजी यांच्या मूर्ती पासून रेल्वे चौक सुभाष चौक तेथून आशा टॉकीज मार्गे बीबी कॉम्प्लेक्स येथून छत्रपती शिवाजी महाराज तेथून मोतीपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तेथून पंचायत समिती अशी रॅली काढण्यात आली.

 

या रॅलीमध्ये सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.  तसेच पंचायत समिती प्रांगणात पोहोचल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.त्यानंतर या रॅलीमध्ये जवळपास 25 कर्मचारी संघटनेचा समावेश होता. रॅलीला यानंतर मार्गदर्शन करण्यात आले.वेगवेगळ्या संघटनेच्या अध्यक्षांनी वेगवेगळ्या विचारांवर प्रकाश टाकत जुनी पेन्शन किती महत्त्वाचे आहे याबाबतीत मार्गदर्शन केले.याच रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन संदर्भात एक शपथ देण्यात आली.शेवटी आभार प्रदर्शन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला.

Protected Content