महाजन व वाघ यांनी माझा घात केला- ए. टी. पाटील

12334

जळगाव प्रतिनिधी । षडयंत्र रचून माझे तिकीट कापले, गेल्या दोन वर्षांपासून माझे तिकीट कापण्याचे काम सुरू होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांनी माझा घात केला आहे, असा आरोप खासदार ए.टी.नाना पाटील यांनी पारोळा येथे झालेल्या सभेत केला.

काय म्हटले खासदार ए.टी.नाना पाटील
माझं तिकीट कापण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून भाजपाचे जिल्हाध्यक्ष वाघ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले ते पुढे म्हणाले की, माझी काही चूक असेल तर तुम्ही या चौकात येऊन मला फाशी देऊ शकता. जेव्हा जेव्हा माझ्या संकट येतात त्यामुळे बालाजी देवाचा भक्त असून माझ्यावर कुठलेही संकट नाहीसे केले. जळगाव मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी असताना मी कुठल्याही पक्षाच्या संदर्भातली गटबाजी केली नाही किंवा कुठलाही नेता संदर्भात कोणाकडे काही वाईट बोललं नाही, तरीसुद्धा माझे तिकीट कापले ही शोकांतिका आहे. गेल्या दोन पंचवार्षिक पासून मी जनतेचे अविरतपणे सेवा करत आहे तरी माझ्यावर अन्याय झाला, माझा घात केला आहे, आज मला तिकीट मिळाले असते तर नाहीतर मी मंत्री झालो असतो.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहाची भेट घेणार
जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता टाकत आहे. भारतीय जनता पार्टीचे जात नाही यावर यावेळी सुद्धा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे आता काळाची गरज आहे आणि पक्षाचे कार्यकर्ते आहोत, मोदींचे भक्त आहोत त्यांचे कार्य चांगले आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये एकही मंत्री भ्रष्ट नाही, उमेदवारी नाकारून पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. उमेदवारी का नाकारली? या बाबत मात्र पक्षाने कोणतेही कारण सांगितले नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तरीसुद्धा पक्षश्रेष्ठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून माझं चुकलं असेल तर मला नक्की सांगा असे विनंती करणार आहे.

नाथाभाऊवर देखील अन्याय झाला- खासदार पाटील
आज जिल्ह्यात लेवा समाजाचे मोठे वर्चस्व आहे. बारा खात्याचा मंत्री असलेले नाथाभाऊ यांच्यावरती देखील हीच परिस्थिती ओढवलेली आहे. तीच परिस्थिती माझ्यावर ओढावली आहे. आज माझी सभा असताना माझ्या पक्षातील वरिष्ठांकडून सभा होऊ नये म्हणून दबावतंत्र अवलंबण्याचा प्रयत्न करत होते, निवडणूक जिंकणे हे तर चालूच असते पण माझे काम चांगले असताना देखील माझे तिकीट कापले गेले ही दुर्दैवाची बाब आहे.

Add Comment

Protected Content