जेटली यांच्या निधानाने शिवसेनेचे मोठे नुकसान – खा. राऊत

sanjay raut

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (दि.१८) सुरुवात झाली, यावेळी राज्यसभेत कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शोक प्रस्तावादरम्यान दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. अरुण जेटली यांच्या निधानाने देशाचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक नुकसान हे शिवसेनेचे झाले आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.

 

राज्यात भाजपाची साथ सोडल्यानंतर तसेच भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसले आहेत. सभागृहाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्दावरुन भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असून, केंद्रानं अतिरिक्त मदत देण्याची मागणी करीत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. त्याचबरोबर अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर लोकसभेतून सभात्याग केला.

दरम्यान, कामकाजाच्या सुरुवातीला सभागृहाचे माजी सदस्य दिवंगत अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहताना खा. राऊत म्हणाले की, “संघर्षाचे दुसरे नाव अरुण जेटली हे होतं. त्यांच्या प्रत्येक संघर्षात मी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करीत होतो. नाती काय असतात आणि ती कशी टिकवायची हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो, मी जेटलींना उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षाच्यावतीने श्रद्धांजली वाहतो,” असेही राऊत यावेळी म्हणाले.

Protected Content