प्रवाशी महिलेच्या पर्समधून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घडना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शुभांगी अतुल शिंदे (वय-२७) रा. चुंचाळे ता. चोपडा ह.मु. वापी गुजरात या महिल्या कामाच्या निमित्ताने २७ मे रोजी रोजी बसमधून प्रवास करत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधुन दीड लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हा प्रकार लक्षात आल्याने महिलेला धक्काच बसला. महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे.

Protected Content