बांधकाम मिस्तरी कामगार संघटनेचा भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये वाळू वाहतूकीला पुर्णपणे बंदी केली आहे. बांधकामच्या ठिकाणी वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम मिस्तरी व कामगार यांची कामे ठप्प झाली आहे. वाळू वाहतूक सुरू करावी या मागणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर बांधकाम मिस्तरी व कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला.

महसुल विभागाच्या वतीने जळगाव जिल्ह्यात वाळू वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाळू वाहतूक पुर्णपणे बंद झाले आहे. दुसरीकडे वाळूची चोरटी वाहतूक केली तर महसूल पथक कारवाई करत वाहने जप्त करतात आणि वाहन सोडविण्यासाठी लाखो रूपयांचा दंड भरावा लागत आहे. वाळू मिळत नसल्यामुळे इमारतीचे बांधकाम जवळपास सर्वठिकाणी थांबलेले आहे.

यामुळे बांधकाम मिस्तरी आणि कामगार यांच्या कामे नसल्याने रोजंदारी बंद झाली आहे. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.  त्यामुळे शासनाने वाळूचा ठेका सुरू करून वाळू वाहतूकीला परवानगी देण्यात यावी यासाठी सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Protected Content