तूर पिकाच्या वाणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । तुर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनिकिटकरीता जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ईमेल द्वारे १० जून पर्यंत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव कार्यालयात १० जून, २०२१ पर्यंत कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर अर्ज पाठवावे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. अभियान संचालक तथा कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगाम तूर पिकाच्या मिनिकिट वितरणाबाबत जिल्ह्यातील शेतकरी बांधव, आत्मा गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी व मागासवर्गीय/आदिवासी शेतकरी बांधव यांचेसाठी मिनीकिट पुरवठादार संस्था, नाफेडव्दारे तूर पिकाच्या राजेश्वरी या वाणाचा एकुण १४ क्विंटल (एकुण ३५० मिनिकिट, प्रती बॅग ४ किलो) पुरवठा जिल्ह्यातील एकाच ठिकाणी होणार आहे.

Protected Content