भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संविधान बचाव देश बचाव आंदोलन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यामानाने देशव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.  याअंतर्गत तहसील कार्यालयासमोर संविधान बचाव देश बचाव आंदोलन करण्यात आले.

 

भारतीय जनता पक्ष,राष्ट्रीय स्वयंसेवक सरकार संविधानाला न जुमानता संविधान  बाजूला ठेवून नागरिकांचे मौलिकअधिकार हनंन करण्याचे कायदे बनवत आहे. या विरोधात संविधान बचाव देश बचाव या विषयाच्या अनुषंगाने १४ मुद्द्यांना घेऊन देशातील  ५५० जिल्ह्यातील ४००० तालुक्यांमध्ये  शृंखलाबद्ध राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आपल्या अन्यायग्रस्त बांधवांना न्याय मिळत नाही आहे .  मूलनिवासी बांधवांच्या विरोधात निर्णय घेत जात आहे. यातून  आरएसएस बीजेपीद्वारा संविधान द्रोह सुरू केला जात आहे.  म्हणूनच बीजेपी आरएसएसच्या विरोधात विविध संघटनांच्या माध्यमातून चरण बद्दल आंदोलन केले जात आहे  या आंदोलनात  भारतीय विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न वारडे,   बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक कुंदन तायडे,  भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज तायडे, राष्ट्रीय रोहिदास क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष शशिकांत सावकारे,  बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष संतोष तायडे , आणि भारतीय युवा मोर्चा,  भारतीय बेरोजगार मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते  मयूर तायडे, आदेश लोंढे, आकाश लोंढे,अनिकेत लोंढे,  सोहन तायडे, धीरज तायडे,  समीर तडवी, आकाश अधाळे  ईश्वर तायडेआदी सर्व उपस्थित होते.

Protected Content