पाचोरा तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान : पंचानामे करण्याचे प्रशासनाचे आदेश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गेल्या दोन दिवसांपासून पाचोरा तालुक्यासह परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावुन घेतला आहे. झालेल्या नुकसानीचे रितसर पंचनामे करण्यात यावेत. म्हणून आज दि. २१ आॅक्टोबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत आ. किशोर पाटील यांनी आॅनलाईन पद्धतीने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचेशी संवाद साधत पंचनामे संदर्भात सुचना दिल्या. बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, ता. कृषी अधिकारी आर. एन. जाधव, मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शिवसेना (शिंदे गटाचे) तालुका प्रमुख सुनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, प्रविण ब्राह्मणे, आमदारांचे स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील सह पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय व कृषी कार्यालयाचे अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात दि. १८ आॅक्टोबर रोजी पाचोरा – ७५.०८ मि. मी., नांद्रा – ६९ .०८ मि. मी., नगरदेवळा – २४.०३ मि. मी., गाळण – ३०.५ मि. मी., कुऱ्हाड – ४ . ५ मि. मी., पिंपळगाव (हरेश्र्वर) – ६९.३ मि. मी., वरखेडी – ६७ . ०८ मि. मी., दि. २१ आॅक्टोबर रोजी पाचोरा – ६२.०० मि. मी., गाळण – ५०.०० मि. मी., वरखेडी – ४९.०० मि. मी., पिंपळगाव (हरेश्वर) – ५.०० मि. मी., कुऱ्हाड – ७.०० मि. मी., तर नांद्रा व नगरदेवळा ० मि. मी. याप्रमाणे पाऊस पडला असुन ३३ टक्क्यांपेक्षा जास्त तसेच ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी सुचना पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी मुंबई येथुन आॅनलाईन पद्धतीने उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांना दिल्या.

Protected Content