दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी केली महाविद्यालयाची स्वच्छता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशभरात स्वच्छ भारत अभियान टप्पा २ ला सुरुवात झाली आहे. जळगावात नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी शासकीय आयटीआय जळगाव परिसरात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.

जळगाव जिल्ह्यात केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे स्वच्छ भारत अभियान टप्पा २ राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवित आहेत. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून शुक्रवारी शासकीय आयटीआय जळगाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ भारत अभियानाचे महत्व विषद करून अभियानाला सुरुवात झाली. नेहरू युवा केंद्राचे लेखाकार अजिंक्य गवळी यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी शासकीय आयटीआय जळगावचे प्राचार्य एस.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक बाळासाहेब कुमावत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दीपक कोळी, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, गौरव वैद्य आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शासकीय आयटीआय आणि बाहेरील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात एकल वापर प्लास्टिक संकलित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी २० मोठ्या बॅग कचरा संकलित करून घंटा गाडीत टाकला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Protected Content