मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र – परमबीर सिंग

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते असा आरोप मुंबईचे पोलीस आयुक्त  परमबीर सिंग  यांनी केले आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबईपोलिसांवर बरीच टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक प्रकारे अपप्रचार सुरु होता. त्या सगळ्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं म्हटलं आहे. 

परमबीर सिंग पुढे म्हणाले, सुशांतप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानकारक होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंटस तयार करून  त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व फेक अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही सिंग यांनी दिली. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.