Home Cities यावल काँग्रेसने अल्पसंख्यांकांचा वापर केवळ मतपेढी म्हणून केला- खडसे

काँग्रेसने अल्पसंख्यांकांचा वापर केवळ मतपेढी म्हणून केला- खडसे

0
42

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । काँग्रेस सरकारने नेहमी अल्पसंख्यांकांची दिशाभूल करीत त्यांचा केवळ मतां साठी वापर केला असल्याचा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला. ते फैजपूर येथे बहुउद्देशिक हॉलमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

महायुतीच्या रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर आमदार हरिभाऊ जावळे, नगराध्यक्षा महानंदा होले, जिल्हा सचिव सुनील नेवे, आरपीआयचे विभाग प्रमुख रमेश मकासरे, दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, गटनेते मिलिंद वाघुळदे, पी. के. चौधरी, निलेश राणे, अल्पसंख्याक आयोगाचे जिल्हाध्यक्ष शकील भाई, अमिता चौधरी, वत्सला कुंभार, शकुंतला भारंबे, भाजप तालुकाध्यक्ष डॉ नरेंद्र कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राकेश फेगडे, नगरसेवक देवेंद्र साळी, शहराध्यक्ष संजय रल, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख राजू काठोके, माजी नगरसेवक आप्पा चौधरी, नितीन नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खडसे म्हणाले की, अल्पसंख्याकांसाठी खरे काम झाले असेल तर ते या पाच वर्षयाच्या युतीच्या काळात झाले केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्याकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या विकासासाठी मोठा निधी देण्यात आला. ते पुढे म्हणाले की, सुरक्षित सक्षम नेतृत्वासाठी ही निवडणूक असून मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रक्षा ताईंना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, शकील भाई व हिरालाल चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. के. चौधरी यांनी केले तर आभार संजय सराफ यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound