दुसर्‍या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानास आज सकाळी सात वाजेपासून प्रारंभ झाला असून यात विविध मातब्बरांची प्रतिष्ठा पणास लागली आहे

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये गुरुवारी देशातील ९५ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. या जागा १२ राज्यांतील आहेत. या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात दुसर्‍या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. दुसर्‍या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडयातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदानास प्रारंभ झाला आहे.

Add Comment

Protected Content