पंचकुला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा लोकसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेसवर वरचढ ठरला. अशात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने हरियाणा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तोशामच्या आमदार आणि माजी मंत्री किरण चौधरी आणि त्यांची कन्या श्रुती चौधरी या दोन्ही माय-लेकींनी भाजपात प्रवेश केला. त्या राज्य काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांपैकी एक आहेत. किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सून आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षांतराचा निवडणुकीवर होऊ शकतात.
२००८ मध्ये हुड्डा आणि किरण यांच्यात मतभेद सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्री हुड्डा यांनी किरण यांना पर्यावरण खात्यातून काढून टाकले. परंतु, या प्रकरणात पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. २०२२ मध्ये दोन्ही नेत्यांमधील संबंध आणखी ताणले गेले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवानी-महेंद्रगड जागेसाठी काँग्रेसने हुड्डा यांचे निष्ठावंत मानले जाणार्या राव धनसिंग यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, किरण यांना त्यांची लेक श्रुतीची त्या जागेसाठी निवड करणे अपेक्षित होते. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद आणखी वाढले.