मलिंगाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना

min

कोलंबो वृत्तसंस्था । श्रीलंकेचा दिग्गद गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी दि. 23 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिला वन-डे सामना हा मलिंगाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. मलिंगापाठोपाठ आता लंकेच्या आणखी एका गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या नुवान कुलसेकराने आज निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय नुवानने 21 कसोटी, 184 वन-डे आणि 58 ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017पासून नुवान वरिष्ठ संघाकडून खेळलेला नाही. त्याचा वर्ल्ड कप संघात समावेशही करण्यात आला नव्हता. त्यानं 2003 साली वयाच्या 21व्या वर्षी वन-डे संघात पदार्पण केले होते. 2 वर्षानंतर त्यानं कसोटीत पदार्पण केले.

Protected Content