‘कोवॅक्सिन’चा डोस घेतलेल्या हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोना

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना झाल्याचं कळाल्यानंतर विज यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यांना उपचारासाठी अंबाला येथील छावणीमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करून घेण्याचं आवाहनही विज यांनी केलं आहे.

कोरोनाची लागण झालेल्या अनिल विज हे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये सहभागी झाले होते. महिनाभरापूर्वी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी विज यांनी स्वतःचं नाव दिलं होतं. रोहतकमध्ये त्यांनी लसीचा डोस घेतला होता.

Protected Content