रिक्षाला लावलेल्या जामरची चोरी; रिक्षाचालकासह एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहर वाहतूक शाखेने कारवाईत रिक्षाला लावलेले लोखंडी जामर चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी नवीन बसस्थानकाजवळ घडली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक महिती अशी की, शहरातील नवीन बसस्थानकाजवळ शहर वाहतूक शाखेने बेशिस्त पध्दतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तर काही ठिकाणी वाहन बेशिस्तपणे पार्किंग लावल्याने शहर वाहतूक शाखेने जागेवरच जामर लावण्याची कारवाई केली होती. शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ३४५०) ही बेशिस्तपणे नवीन बसस्थानकाजवळ लावली होती. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी पो.कॉ. मंगेश रविंद्र पाटील यांनी कारवाई करत रिक्षाला लोखंडी जामर लावण्यात आले होते. यानंतर रिक्षा चालक सोनू नंदू लोहाळेकर रा. कालभैरव मंदीरासमोर, नाथवाडा, सिंधी कॉलनी यांने रिक्षाला लावलेले जामर विशाल एकनाथ पवार (रा. कासम वाडी) यांच्या मदतीने काढून चोरून नेले. पो.कॉ. मंगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालक सोनू लोहाळेकर आणि विशाल पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content