अमेरिकेत बेकायदा वास्तव्य ; ११ भारतीय विद्यार्थ्यांना अटक

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत बेकायदा वास्तव्य केल्याने १५ विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या इमिग्रेशन अॅण्ड कस्टम्स एनफोर्समेंट प्रशासनाने अटक केली यामध्ये ११ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बोस्टन, वॉशिंग्टन, ह्युस्टनसह अन्य शहरांतून ही अटक करण्यात आली.

भारतीय विद्यार्थ्यांसोबत लिबियाचे दोन, सेनेगल आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. ही अटक ‘ऑप्टिकल इल्युजन’ मोहिमेचा एक भाग आहे. विदेशातून आलेल्या ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’ कार्यक्रमाचा बेकायदा वापर करून अमेरिकेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जात आहे विदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात अमेरिकेत एक वर्षापर्यंत काम करण्याची परवानगी मिळते. विद्यार्थी ‘एसटीईएम’ पर्यायी प्रॅक्टिकल प्रशिक्षणात सहभागी झाला तर त्याला आणखी २४ महिने देशात काम करण्याची संधी दिली जाते. या अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमध्ये काम करत असल्याचा दावा केला होता.

Protected Content