रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रावेर काँग्रेस कमिटीमध्ये आज रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांनी दि. ९ ऑगस्टपासून काँग्रेसतर्फे पदयात्रा सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली.
यात ते म्हणाले की, “‘मिशन मिनी विधानसभा‘ निवडणूक आणि ‘लोकसभा‘ निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी मजबूत केली जात आहे. त्याचबरोबर प्रदेश काँग्रेसच्यावतीने निर्देशित कार्यक्रमांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
यासोबतच सरकारकडून ईडी, सीबीआय आणि इतर प्रशासकीय यंत्रणांमार्फत विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात असून त्यांच्या विरोधात कारवाईची तयारी सुरू आहे. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रावेर काँग्रेसने रावेर तालुक्यातील सर्व शहरांमध्ये पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधण्याचा कृती आराखडा तयार केला आहे.
आज रावेर काँग्रेस कमिटीमध्ये रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व प्रदेश उपाध्यक्ष शिरीष चौधरी यांनी सांगितले की, “स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसतर्फे दि. ९ ऑगस्टपासून तालुक्यातील सातपुडा येथील चिंचाटी गावातून पदयात्रा सुरू केली जाणार असून मार्गक्रमणाची रूपरेषा जारी करण्यात आली आहे.
या पदयात्रेत विधानसभा मतदारसंघातील आमदार व वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. दि. १५ ऑगस्टपर्यंत ही पदयात्रा चालणार असून यामध्ये रावेर तालुक्यातील सुमारे १२० गावे फिरणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी रावेर शहरातील काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरीश शेट गणवाणी, रामदास लहासे, दिलरुबाब तडवी, गोंडू महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, गुणवंत सातव, सरपंच योगेश पाटील, राहुल पाटील, इस्माईल पहेलवान, सुरेश पाटील, डॉ.कालिंदर तडवी संतोष पाटील, सावन मेडे, भीमा तायडे, मानसी पवार, प्रतिभा मोरे, कामगारांशी सल्लामसलत केली जात आहे.रावेर विधानसभा पदयात्रेचा मार्गक्रमांक निश्चित करण्यात आला आहे.